Bharati Pawar 
महाराष्ट्र

घरात बसुन काम करु शकत नाही, म्‍हणूनच जनतेत जातोय; भारती पवार यांचा मुख्‍यमंत्र्यांना टोला

घरात बसुन काम करु शकत नाही, म्‍हणूनच जनतेत जातोय; भारती पवार यांचा मुख्‍यमंत्र्यांना टोला

दिनू गावित

नंदुरबार : लोकशाहीने दिलेला अधिकाराचे कोविड नियमांचे पालन करुन आम्ही जन आशिर्वाद यात्रा करत आहोत. आम्ही घरात बसुन काम करु शकत नाही. त्यामुळे जनतेत जात आहोत; असा टोला केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी मुख्‍यमंत्री यांना लगावला. (nandurbar-news-Bharti-Pawar-scolds-maharashtra-Chief-Minister-in-press-meet)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यंमत्री भारती पवार यांची जनाशिर्वाद यात्रा आज नंदुरबारमध्‍ये आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या. मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री महोदय मला माफ करा असे म्‍हणत आम्ही जनतेत जाणार, आम्ही कुपोषण आरोग्याची माहिती घेणार. कारण मला सभागृहात उत्तर द्यावे लागते. मुख्यमंत्री आम्हाला जनतेपासुन तोडु नका; टिका करुन राजकारण करु नका असा टोला देखील त्‍यांनी मुख्यमंत्रींना लावला.

कोरोनाचे राज्यात एक लाख डोस वाया

कोरोनाच्‍या अनुषंगाने आतापर्यंत देशात ५६.६४ कोटी लोकांना लसीकरण झाले. यात सर्वाधिक लसींचे डोस महाराष्ट्राला दिले आहे. परंतु, महाराष्‍ट्र राज्यात एक लाख डोस वाया गेल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु झाला; याबाबत केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहुन १३ ऑगस्टपर्यत आकडेवारी देण्यास सांगितले होते. परंतु, राज्याकडुन केंद्राला अद्यापही माहीती मिळालेली नाही.

कोरोनाची परिस्थीती अद्यापही चिंताजनक

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थीती अद्यापही चिंताजनक आहे. त्या जिल्ह्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याची गरज आहे. ईशान्येकडील राज्यांनी याची कडक अंमलबजावणी करत कोरोना आटोक्यात आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT