Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : अस्तंबा ऋषी पर्वतावरून पडून तरुणाचा मृत्यू; यात्रोत्सवानिमित्ताने दर्शनाला गेला असतानाची घटना

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वस्थामा ऋषी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वस्थामा ऋषी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी दर्शनासाठी भाविक जात आहेत. अशाच प्रकारे दर्शनासाठी गेलेल्या तरुणाला अचानक भोवळ आल्याने तो उंच शिखरावरून खोल दरीत पडला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वस्थामा ऋषी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत आदिवासी बांधव अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी जात असतात. आपल्या शेतात पिकवलेलं नवं धान्य अस्तंबा ऋषीला नैवेद्य दाखवल्यानंतर धान्य कापणीला आदिवासी बांधव सुरुवात करत असतात. या यात्रोत्सवाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हजारो तरुण पदयात्रा करत अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी शिखरावर रवाना होत असतात. 

अशाच प्रकारे अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवादरम्यान दर्शनासाठी शिखरावर तरुण गेला होता. शिखरावर चढल्यानंतर त्या तरुणाला अचानक भोवळ आल्याने तो उंच शिखरावरून खोल दरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. निखिल वाडीले असे या मृत तरुणाचे नाव असून शहादा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. खोल दरीत पडलेला या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT