Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नाश्त्याचे पैसे मागितल्याचा राग; हॉटेल व्यावसायिक बापलेकावर जीवघेणा हल्ला

नास्‍त्‍याचे पैसे मागितल्याचा राग; हॉटेल व्यावसायिक बापलेकावर जीवघेणा हल्ला

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात नाश्‍ता सेंटरवर नास्ता करून चौघा टवाळखोरांनी (Nandurbar) पैसे न देताच निघून जात असतांना हॉटेल व्यावसायिकाने पैसे मागितले. याचा राग येऊन चौघांनी हॉटेल व्यावसायिक मुलगा व वडिलांवर प्राणघातक हल्‍ला केला. पोलिसांना (Police) माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थली पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. (Maharashtra News)

नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात गणेश अरूण परदेशी (वय २३) व त्याचे वडील अरूण श्रीपत परदेशी हे हॉटेल व्यवसाय करतात. दरम्‍यान बुधवारी (१२ जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील दीपक बाबुलाल सोनवणे, शंकर पवार, गोपाल शिंदे, शनि उर्फ काळ्या संतोष केंगार (सर्व रा. गिरीविहार गेट समोरील होलारवाडा, नंदुरबार) हे तेथे (Crime News) आले. त्यांनी नास्ता मागितला. त्याप्रमाणे हॉटेल व्यावसायिक गणेश परदेशी व त्याचा वडिलांनी ग्राहक म्हणून चौघांना नास्ता दिला.

पोटभर खाल्यानंतर चौघांनी पैसे न देताच रफूचक्कर होण्याचा तयारीत होते. ही बाब गणेश परदेशी यांचा लक्षात आली. त्यामुळे गणेश परदेशी यांनी त्यांचाकडे नास्त्याचे पैसे मागितले. त्यावरून शाब्दीक वाद झाला. पैसे मागितल्‍याचा राग येऊन चौघांनी व त्यांचा काही साथीदारांनी मिळून गणेश व त्याचे वडील अरूण परदेशी यांना मारहाण सुरू केली. त्यात दीपक सोनवणे याने धारदार लोखंडी कोयत्याने वार केले. तर शंकर पवार याने हातात असलेला डेंगाऱ्याने हाता पायांवर मारले व इतर दोघांनी सळइने डोक्यावर मारहाण केली. त्यात हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT