Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : १५ दिवसांपासून रुग्णवाहिका नादुस्त; आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल

१५ दिवसांपासून रुग्णवाहिका नादुस्त; आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णसेवा कोलमळली आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा सुरळीत राहाव्या यासाठी दोन रुग्णवाहिका (Ambulance) देण्यात आल्या होत्या. मात्र दोन्हीही रुग्णवाहिका १५ दिवसापासून (Nandurbar) नादुरुस्त असून धूळखात पडल्या आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. (Live marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका अभावी रुग्णाचे हाल होत आहे. १०८ च्या रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने अत्यावश्यक सेवा गरजेचे रुग्ण, अपघाताच्या गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठविण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १०२ च्या दोन रुग्णवाहिका उपलब्ध असल्या; तरी त्या गरोदर (Health Department) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. १०८ च्या रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मात्र रुग्णांचे हाल सुरूच आहे. 

मनसेचा इशारा 

सध्या नगरपंचायतीची रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. मात्र त्यांचे भाडे रुग्णांना उचलावे लागत आहे. प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून रुग्णांचा जीवाशी खेळ हा धडगाव ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. खराब रुग्णवाहिका लवकर दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT