Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : अक्राणी- अक्कलकुवा विधानसभेवर भाजप आणि शिंदे गटाचा दावा; महायुतीत वाद होण्याची शक्यता

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा पैकी क्षेत्रापैकी अक्राणी- अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा केला असून त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरु असताना अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. याच दरम्यान महायुतीतील शिवसेना व भाजपकडून जागा वाटप झाल्या असून काही ठिकाणी अजूनही संभ्रमावस्था आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी- अक्कलकुवा या मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चार विधानसभा पैकी क्षेत्रापैकी अक्राणी- अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा केला असून त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून याच विधानसभा क्षेत्रावर (BJP) भाजपच्या हिना गावित या देखील तयारी करत असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागेवर तिकीट कोणाला मिळेल हे स्पष्ट झाल्यानंतर येथील पुढील समीकरण अवलंबून आहे.  

दरम्यान अक्राणी- अक्कलकुवा विधानसभेची जागा शिवसेनेला मिळते कि भाजपला ही जागा मिळते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेची तयारी करत आहेत. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचं नाव न आल्यामुळे आता संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र दुसरीकडे या जागेवरून आता महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT