Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News: प्रेमसंबंध तुटल्‍याचा विरह; युवकाने उचलले टोकाचे पाऊल

प्रेमसंबंध तुटल्‍याचा विरह; युवकाने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

शहादा (नंदुरबार) : प्रेयसीने लग्न करण्यास नकार देत प्रेमसंबंध तोडले. याचा विरह सहन न झाल्याने शहाद्यातील जोशीपुरा येथील एका २२ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहादा (Shahada) पोलिसात प्रेयसी व तिचा मित्र या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Letest Marathi News)

शहादा शहरातील जोशीपुरा भागात राहणाऱ्या सय्यद वैस सय्यद इरफान (वय २२) या युवकाने १ मार्चला दुपारी राहत्या घरी गळफास (Nandurbar News) घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आत्महत्या का करत आहे? याबाबतची एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. घरच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे व पथकाने घटनास्थळी जात पाहणी केली. येथे आढळून आलेल्‍या सुसाईड नोटनुसार पोलिसांनी चौकशी केली असता, सदर आत्महत्या प्रेमसंबंध तुटल्यामुळे झाल्‍याचा कयास पोलिसांनी बांधला.

सुसाईड नोटमध्ये लिहील्यानुसार मयत सय्यद वैस सय्यद इरफान याचे शहरातील एका तरुणीशी प्रेम संबंध होते. तिच्याशी त्याला लग्न करायचे होते. संबंधित प्रियसीलाही त्याच्याशी लग्न करायची इच्छा होती. मात्र ही बाब सागर जव्हेरी याला माहिती पडल्यानंतर त्याने सदरची बाब युवतीच्या आईला सांगितली. यानंतर युवतीच्या आईने युवकाशी प्रेम संबंध तोडण्याचा सल्ला युवतीला दिला. दोघांचे प्रेमप्रकरण तुटल्यानंतर विरह सहन न झाल्याने सैय्यद वैसने आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जळगावात तिरंगा रॅली

दिपकेंनंतर दिल्ली पोलिसांनी नेहा बोरालाही घेतलं ताब्यात; कनॉट प्लेसवर आंदोलकांची तुफान गर्दी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निळं आकाश आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'या' 5 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

Cleaning Tips : नळांवर पांढरे डाग पडतायेत? या ट्रिक्स करा फॉलो, नळ दिसतील नवेकोरे

नागपूर ते गोवा प्रवास सुपरफास्ट! 8 तासांत पोहोचणार समुद्राच्या किनारी; 13 जिल्ह्यातून जाणार महामार्ग

SCROLL FOR NEXT