Accident
Accident 
महाराष्ट्र

५० फुट दरीत कोसळली पिकअप; एक ठार, तीन गंभीर

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्‍या गुडांचापाडा येथे पिकअप वाहनाचा अपघात झाला. चढावावरून गाडी जात असताना सदर अपघात झाला असून, पिकअप गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली आहे. यात एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. (nandurbar-news-accident-news-dhadgaon-pikup-van-50-foot-down-one-death)

डोंगराळ भागात असलेल्‍या गुडांचापाडा (ता. धडगाव) परिसरातून धान्य भरून जात असलेल्‍या पिकअप वाहनाला अपघात झाला. यात आदीवासी नागरीक देखील बसलेले होते. त्रिशुल गावातून धडगाव बाजारपेठेत धान्य विक्रीसाठी येत असताना अपघात झाला. पिकअप वाहन चढावर चढतांना वाहनाचा जॉईन क्रॉस तुटला. यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ५० फूट पुलावरून खोल दरीत कोसळले आहे.

जखमींना तातडीने मदत

डोंगराळ भागात सदर अपघात झाला असून, गाडी खोल दरीत कोसळल्‍याने यात एकाचा जागीच मृत्‍यू झाला आहे. तर अन्‍य तीन जण गंभीर जखमी झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकाद्वारे नेण्यात आले. घटनास्थळी धडगाव पोलीस कर्मचारी दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Chaturvedi On Narendra Modi | भ्रष्टाचार थांबला का? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल

Sanjay Raut Letter : 'नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट'; संजय राऊतांचं थेट PM मोदींना पत्र

Lok Sabha Election 2024: तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश

Health Tips : जेवणानंतर लस्सी पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण; वाचा लस्सी पिण्याचे दुष्परिणाम

Ghatkopar Hoarding Update | NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, 14 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT