Accident saam tv
महाराष्ट्र

Accident: घाटात कठडा तोडत टेम्‍पो पलटी

घाटात कठडा तोडत टेम्‍पो पलटी

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर– पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या आयसर टेंम्पोचा अपघात झाला. घाट रस्‍त्‍यातून जात असताना वेगावर ताबा मिळविता न आल्‍याने रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेला कठडा (Accident) तोडून टेम्‍पो खाली कोसळला. (nandurbar news accident news Breaking the wall in charanmal ghat tempo turned)

नवापूर (Navapur)– पिंपळनेर रस्‍त्‍यावरील चरणमाळ घाटात झालेल्‍या अपघातातील सदर टेम्पो नाशिकहून (Nashik) अहमदाबादकडे (Ahmadabad) जात असल्याची प्राथमिक माहिती प्राप्‍त झाली आहे. रस्‍त्‍यावरून जात असताना घाटातील तीव्र उतार व वळण असल्‍याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे वेगाने आलेल्‍या टेम्‍पोचा कठडा तोडत अपघात झाला.

कोंबड्यांचा चेंदामेंदा

कोंबड्यांची वाहतुक करत असलेल्‍या टेम्‍पोच्‍या अपघातात चालक व सहचालक दोन्ही जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला नवापूर व अतिगंभीर जखमीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अपघातग्रस्‍त टेम्पोत असलेल्‍या कोंबड्यांचा चेंदामेंदा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

SCROLL FOR NEXT