Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: भीषण अपघात; कंटेनरने बैलगाडी स्वारास चिरडले

भीषण अपघात; कंटेनरने बैलगाडी स्वारास चिरडले

दिनू गावित

नंदुरबार : शहादा– प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावानजीक शहादाकडे जात असलेल्या बैलगाडीस्वारास मागून येणाऱ्या कंटेनर ने जोरदार (Accident) धडक दिली. यात बैलगाडीस्वार शेतकरी (Farmer) जागीच ठार झाला असून बैल देखील ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. (Nandurbar Accident News)

सदरील घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. लांबोडा (Nandurbar) येथील शेतकरी हरसिंग सरदार सिंग गिरासे (वय 50) हे आपल्या शेतात कल्टीवेटर करण्यासाठी बैलगाडीने जात होते. या दरम्‍यान नंदुरबारकडून शहाद्याच्या (Shahada) दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने दालमिल समोर जोरदार (Accident News) धडक दिली.

शेतकरीसह बैलाचाही मृत्‍यू

अपघातात बैलगाडीस्वार हरसिंग सरदारसिंग गिरासे (रा. लांबोळा) हे शेतकरी जागीच ठार झाले. याशिवाय अपघातात एक बैल देखील ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT