Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: वीज पडून चार शेतकऱ्यांच्या 16 बकऱ्या ठार

वीज पडून चार शेतकऱ्यांच्या 16 बकऱ्या ठार

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ गावातील चार शेतकऱ्यांच्या (Farmer) बकऱ्यांवर विज पडल्याने 16 बकऱ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Nandurbar News Lightning Strike)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये परतीच्या पावसाचे (Rain) चित्र पहावयास मिळत आहे. या दरम्‍यान डोंगरदऱ्यात बकऱ्या चारायला गेलेल्या बकऱ्यांवर विज (Lightning Strike) पडल्याने तब्बल 16 बकऱ्या ठार झाल्या आहे. खुर्चीमाळ येथील रहिवासी देवजी हांद्या नाईक यांच्या ७ बकऱ्या, सायसिंग चांद्या नाईक १ बकरी, काल्ला सूरजी नाईक यांच्या ५ बकऱ्या, तर चांद्या टेंबऱ्या नाईक यांच्या ३ अशा एकूण १६ बकऱ्या ठार झाल्या आहेत. तलाठी रोहित पाडवी, गावकरी लकी भाऊ नाईक, पोलीस पाटील लक्ष्मण माकत्या नाईक व गावकरी यांच्या उपस्थितीत महसूल विभागाने पंचनामे केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई लवकर द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT