Malnutrition Death 
महाराष्ट्र

महिनाभरात ९९२ जन्‍मलेल्‍या बालकांपैकी ११८ मृत्‍यू; नंदुरबार जिल्‍ह्यातील चित्र

महिनाभरात ९९२ जन्‍मलेल्‍या बालकांपैकी ११८ मृत्‍यू; नंदुरबार जिल्‍ह्यातील चित्र

दिनू गावित

नंदुरबार : गेल्या सप्टेंबर महिन्यात ९९२ बालकांच्या जन्मापैकी ० ते ६ महिने वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाले आहेत. या नोंदीने कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता जिल्हा दौऱ्यावर असलेल्‍या पंचायती राज समिती सदस्य कुपोषणाची दखल घेतील का? असा प्रश्‍न देखील निर्माण होत आहे. (nandurbar-news-118-deaths-out-of-992-child-births-in-a-month-picture-of-Nandurbar-district)

महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च केले जातो. असे असले तरी योजना राबविण्यासाठी असलेली यंत्रणा भ्रष्टाचारात मग्न असल्याने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळते.

राज्‍यपालांचे दत्‍तक गाव तरीही..

सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी हे गाव राज्यपालांचे दत्तक गाव असतानाही या ठिकाणी असलेली महिला बाल विकास विभागाची यंत्रणा तत्परतेने काम करत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील महिला बालविकास विभागाच्या १२ प्रकल्पांमध्ये सप्टेंबर महिन्यात ९९२ बालकांचा जन्म झाल्याची नोंद असून सप्टेंबर महिन्यात ० ते ६ वयोगटातील ११८ बालकांच्या मृत्यूसह ६ मातांचाही मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

यंत्रणेच्‍या कामकाजावर प्रश्‍नचिन्‍ह

विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील नवजात बालकांच्या मृत्यूत दुर्गम भागापेक्षा सपाटी भागातील नवापूर तालुक्यातील बाल विकास प्रकल्पात सर्वाधिक २२ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने महिला बाल विकास विभागाची संपूर्ण यंत्रणा नेमके काय करतेय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर जिल्हा दौऱ्यावर असलेले पंचायती राज समितीचे सदस्य नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT