Nandurbar Zp School Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Zp School : जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Nnadurbar News : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अगोदरच कमी असताना शाळांची दुरावस्था हा प्रश्न अधिक भेडसावत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट झाली आहे. कुठे पडक्या इमारती आहेत, तर कुठे इमारती जीर्ण झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात असतो. यामुळे नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारतीची दुरावस्था झाली असून अनेक वेळेस प्रशासनाला निवेदन देऊन देखील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती होत नसल्याने खांडबारा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले आहे. 

जिल्हा परिषद शाळांमध्ये (Zp School) विद्यार्थी संख्या अगोदरच कमी असताना शाळांची दुरावस्था हा प्रश्न अधिक भेडसावत आहे. अशीच स्थिती नवापूर (Navapur) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था खराब झाली आहे. खांडबारा गावातील शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज आंदोलन करण्यात आले. 

लेखी आस्वासनानंतर आंदोलन मागे 

आंदोलनात सरपंच अजय गावित यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले, खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व नवीन इमारत साठी शिक्षण विभागाने निधीची मागणी केली असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तूर्तास रद्द करण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT