Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

Nandurbar : धुळ्याच्या साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढपाळ विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात मेंढ्या घेऊन निघाले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे
नंदुरबार
: नवापूर तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. या घटनेत भरधाव ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यांना चिरडले. या घटनेत शंभरहून अधिक मेंढ्यांच्या मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढपाळ विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात मेंढ्या घेऊन निघाले होते. मेंढपाळ (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाने जात असताना आंध्र प्रदेश राज्यातील असलेल्या भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मागून मेंढ्यांमध्ये घुसला. यात शंभरहून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्या आहेत. त्यात काही गर्भवती मेंढ्या देखील होत्या.

लाखो रुपयांचे नुकसान
भरधाव वेगाने रस्त्यावर जात असलेल्या मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रक चालकास विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT