Navapur Fire Saam Tv
महाराष्ट्र

Navapur Fire: वडदे गावात किराणा दुकानाला भीषण आग; संसार जळून खाक, एकाचा मृत्यू

Nandurbar Navapur Fire: नवापूरमधील वडदे गावातील एका छोट्या किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात घर आणि किराणा दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Bharat Jadhav

सागर निकवाडे , साम प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील वडदे गावात एका दुकानाला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार वडदे गावात एका घरामध्ये किराणा दुकान (Grocery store) चालवत होते.

आज दुपारी अचानक दुपारी शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागल्याची घटना घडली. यात एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. या मृत व्यक्तीचे नाव पाऱ्या काथुड्या कोकणी असं होतं. आगीत सापडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण घर व दुकान जळून खाक झाले आहे. हजारो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. वडदे गावातील एका घरात छोटसं किराणा दुकान चालवलं जात होतं.

आग लागल्याने ग्रामस्थ आजूबाजूच्या नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले. मोठा पेट घेतल्यामुळे आगीत दुकानासह घर जळून खाक झाले. या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य व किराणातील किराणा संपूर्ण जळून खाक झाला. या आदिवासी कुटुंब आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने आगीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT