Rescue दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार: तापी नदीत उडी घेत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न!

आत्महत्या करण्याचा प्रयत्न मात्र मच्छीमारांनी वाचविले प्राण...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार : नापास होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. युवती घरून बसमध्ये बसून निझर तालुक्यातील वेलदा टाकी जवळ उतरली तेथून चालत चालत जुना कुकरमुंडा जवळील तापी नदीच्या पुलावर गेली. 50 ते 60 फूट तापी नदीच्या पुलावरून तिने खोल पाण्यात उडी मारली.

दरम्यान, तापी नदीमध्ये प्रचंड पाणी होते. युवती बुडत असल्याचे पाहून पुलावरील लोक आरडाओरड करू लागले. त्यानंतर नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला वाचण्यासाठी जलद गतीने तीन युवकांनी मुलीच्या दिशेने बोट नेली. हवेच्या प्रचंड वेग असल्याने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर नदीत बुडत असलेल्या युवतीला बोटीवर घेतले. मच्छिमार करणाऱ्या तरुणांनी तीचे प्राण वाचवले. तिला बाहेर काढून तिला रुग्णवाहिकेतून निझर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. युवती सुखरूप असून तिची ओळख पटली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावातील वीस वर्षीय तरुणी पार्वती रवींद्र पाडवी असे युवतीचे नाव आहे. अक्कलकुवा येथे एस.वाय.बी.ए चे शिक्षण घेत होती. ता. 15 जून 2022 रोजी परीक्षा होती. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने नापास होण्याच्या भीतीने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे बोलले जात आहे. महाविद्यालयातील प्रशासनाने आत्महत्या करू नये व परीक्षेची भीती दूर करण्यासाठी समुपदेशन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

Ashok Kharat: भोंदू बाबाला मदत करणारे कोण? खरात प्रकरणात SITचा तपास कुठंपर्यंत आला? IPS सातपुतेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSMT जवळ ट्रेनला भीषण आग, कारशेडमधील घटनेनं खळबळ

lathi charge on farmers : शेतकऱ्यांवर लाठीमार, जळगावमध्ये संताप, Video

SCROLL FOR NEXT