Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News : कौटुंबिक वादातून शालकाने केली मेहुण्याची हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात

Nandurbar News : नंदुरबार शहरात राहणाऱ्या मिथुन वळवी याचे आपल्या शालका सोबत कौटुंबिक वाद सुरु होता. दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शालक आणि मेहुण्यात काही कारणात्सव वाद सुरु होता. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात शलकाने मेहुण्याच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून हत्या केली. यानंतर मृतदेह शेत शिवारात फेकून दिल्याची घटना नंदुरबार शहर लगत असलेल्या भोणे शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

नंदुरबार (Nandurbar) शहरात राहणाऱ्या मिथुन वळवी याचे आपल्या शालका सोबत कौटुंबिक वाद सुरु होता. दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या वादावादी शालकाने मेहुण्याच्या डोक्यावर वार करून हत्या (Crime News) करण्यात आली. यानंतर मृतदेह भोने शिवारात असलेल्या फटाक्याच्या फॅक्टरीच्या मागील बाजूस टाकून देण्यात आला होता. मात्र परिसरातील नागरिकांना मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.  

तालुका पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या आहेत. तपासादरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: काटेवाडीतील निवासस्थानी अजितदादांना अखेरची सलामी, पाहा VIDEO

Atal Pension Yojana: सरकारची जबरदस्त योजना! फक्त २१० रुपये गुंतवा अन् महिन्याला ₹५००० पेन्शन मिळवा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजितदादांचा अखेरचा प्रवास सुरू, बारामतीकरांचा टोहो

Plane Crash: हवाई अपघातांत 'हे' दिग्गज मृत्यूमुखी

Airplane Colour: विमाने पांढऱ्याच रंगाची का असतात? जाणून घ्या पांढऱ्या रंगाचं महत्व

SCROLL FOR NEXT