Nandurbar Crime Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar Crime: बदलापूरनंतर नंदूरबार हादरले! शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यानं १० वर्षांच्या मुलीला मोबाइलवर दाखवले अश्लील व्हिडिओ

Sandeep Gawade

Nandurbar Crime Updates: बदलापूर अत्याचार आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या अनेक घटनांना संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातचं नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांला अटक करण्यात आली असून शाळेवर घटना लपवण्याचा होत आहे आरोप होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सफाई कर्मचाऱ्यांने अश्लील व्हिडिओ दाखवले आहेत. सफाई कामगाराने शाळा सुटल्यानंतर एकांतात भेटायला बोलवलं असल्याचीही माहिती आहे. दरम्यान हा सर्व प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सुटला नाही. सीसीटीव्हीत सर्व घटना कैद झाली आहे.

या घटनेनंतर पीडित मुलगी घरी गेली आणि घडलेला सर्व प्रसंग कुटु्ंबीयांना सांगितला. प्रकार ऐकून कुटुंबीयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. मात्र हा सर्व प्रकार शाळेने लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून शाळेची देखील झाडाझडती घेतली जाणार आहे. दोषी आढळल्यास शाळेवर देखील होणार गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सीसीटीव्हीत एक व्यक्ती पाचवीत शिकणाऱ्या त्या मुलीला बोलावून घेते आणि तिथून बाजूलाच असलेल्या एका खोलीत घेऊन जातो. मुलगी खोलीत जात नाही. मात्र सफाई कर्मचारी मोबाईलवर काहीतरी सुरू ठेवून तिच्या हातात मोबाईल देताना दिसत आहे. मुलगी मोबाईल घेते आणि पुन्हा पटकन त्याच्याकडे देते आणि निघून जाते. मात्र पुन्हा कर्मचारी तिला बोलवतो, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT