Akkalkuwa News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : महिलेला प्रसूतीसाठी झोळीत बसवून पुराच्या पाण्यातून नेलं; २१ व्या शतकातलं महाराष्ट्रातलं विदारक दृश्य

Nandurbar News : सरकार एकीकडे आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र हे पैसे खरंच आदिवासींच्या कामात येतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : आदिवासी बहुल परिसर असल्याने येथे सुविधा अजूनही पोहचलेल्या नाहीत. रस्त्याअभावी आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही. यामुळे आदिवासी बांधवावर नेहमीच समस्येला सामोरे जावे लागत आहे. यात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी, नाल्याना पूर आहे. यामुळे या पुरातून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान गरोदर महिलांना तर झोळीत टाकून न्यावे लागत असल्याचे प्रकार नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने होत आहेत. पुन्हा असाच प्रकार अक्कलकुवा तालुक्यात समोर आला आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. मात्र (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात आजही सुविधांपासून इथल्या आदिवासी बांधवांना वंचित रहावे लागत आहे. सरकार एकीकडे आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र हे पैसे खरंच आदिवासींच्या कामात येतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नदीतून या गर्भवती महिलेला नेण्यात आले. 

सुमित्रा विरसिंग वसावे असे गर्भवती महिलेचे नाव आहे. या महिलेच्या पोटात दुखत असल्याने तीला झोळी करून प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाचा मुख्य रस्तापासुन बारीपाडा, पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर पाड्यात जाण्यायेण्यासाठी खुप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाड्यांमध्ये जातांना रस्त्यात मोठी दरी आहे. शिवाय नदी नाल्यामधुन जावे लागत असते.  त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यात लक्ष द्यावा अशी मागणी आता होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी...

पुण्यात धक्कादायक घटना! हात बांधलेले अन् मृतदेह झाडाला लटकलेला; लष्कराच्या जवानासोबत नेमकं झालं काय?

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गड मंदिरातील तब्बल 22 किलो चांदी गायब, ट्रस्टच्या कारभारावर संशय

Summer Skincare Routine: उन्हामुळे त्वचा काळी झालीये? या 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो

कर्नाटक सरकारला मराठीचं वावडं; दहावीच्या निकालातून 'मराठी' शब्दच गायब

SCROLL FOR NEXT