Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Nandurbar Accident News : नंदुरबारमध्ये भीषण अपघातात लग्नाच्या काही दिवसांवर असलेल्या तरुणासह दोन मित्रांचा मृत्यू झाला. भरधाव चार चाकीने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • नंदुरबारमध्ये भीषण रस्ता अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

  • लग्नाच्या काही दिवसांवर असलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत

  • झायलो गाडीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

  • घटनेनंतर नागरिकांचा संताप, पोलिसांकडून तपास सुरू

सागर निकवडे, नंदुरबार

Nandurbar Rohit Bhil and Sajan Bhil Accident Case नंदुरबारमधून मन हेलवणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांवर लग्न असलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. नंदुरबार-धानोरा मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित आप्पा भिल आणि साजन भिल अशी मृतांची नावे आहेत. रोहित भिल याचे काही दिवसांवर लग्न होते. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रोहित आप्पा भिल या तरुणाचे अवघ्या दहा दिवसांवर लग्न ठरले होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती, नातेवाईकांना निमंत्रणे देण्यासाठी तो आपल्या मित्र साजन भिल याच्यासह दुचाकीवरून निघाला होता. मात्र, नंदुरबार-धानोरा मार्गावरील लोय फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रोहित आणि साजन या दोघांनीही प्राण गमावले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त झायलो गाडीला आग लावली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, नंदुरबार उपनगर पोलिसांनी झायलो चालक नाजील पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शिंदे गावात सध्या शोककळा पसरली आहे. आनंदाचे क्षण दु:खात परिवर्तित झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT