Nandurbar Accident news  Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : नंदूरबारमध्ये भीषण अपघात; गरोदर मातांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

Nandurbar Accident News : नंदूरबारमधून भीषण अपघाताची घटना घडली आहे. गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना घडली आहे. लोणखेडा कॉलेज गेट समोर रुग्णवाहिका उलटल्याची घटना घडली आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातावेळी ११ अगोदर माता रुग्णवाहिकेत होत्या. तसेच रुग्णवाहिकेत काही रुग्ण होते. जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारमध्ये (Nandurbar) गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा शहादा येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. लोणखेडा कॉलेज गेट समोर रुग्णवाहिका पलटी झाली आहे.

अपघातावेळी या रुग्णवाहिकेत ११ गरोदर मात्या होत्या. या अपघातात (Accident) कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना शहादा उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण होते.

शहादा शहरात गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरील उपस्थित लोक रुग्णांच्या मदतीस धावले. या अपघातातील जखमी रुग्णांना शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अमरावतीत भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर ट्रक व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्‍या धारणी भोकरबर्डी सीमेवरील देळतलाई शेखपुरा रोडवर ट्रक व चार चाकी गाडीचा अपघात झाला. उसाने भरलेला ट्रक मजूर घेऊन जात होता. यावेळी समोरून आलेल्‍या गाडीने समोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्‍यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाण्यात पाणीकपातीचं संकट! 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा यादी...

Maharashtra News Live Update: - नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

SCROLL FOR NEXT