Nandurbar Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bus Accident: खड्डा चुकविताना बसची ट्रकला जोरदार धडक; बसचा पत्राच कापला गेला, प्रवाशी सुखरूप

खड्डा चुकविताना बसची ट्रकला जोरदार धडक; बसचा पत्राच कापला गेला, प्रवाशी सुखरूप

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार ते तळोदा कमी अंतरात जोडणाऱ्या हातोळा पुलावर बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. बसने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात (Accident) घडला असून यात बसचे मोठ्या (Nandurbar) प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Latest Marathi News)

अक्कलकुवा आगाराची बस तळोदा येथून नंदुरबारकडे जात मार्गस्‍थ झाली होती. या दरम्‍यान सकाळी तापी नदीवरील हातोडा पुलावरून जात असताना समोरून ट्रॉलीमध्ये खाली ड्रम भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला हातोडा पुलावरील जीवघेणा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या समोरील एका बाजूचा पत्रा कापला जाऊन बसचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या अपघातात (Bus Accident) जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच निझर पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी दाखल झाले. अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. उशिराने घटनास्थळी परिवहन मंडळाचे अधिकारी आणि निझर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदणीचे प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT