नंदुरबार : कोंडाईबारी घाटात मालवाहू ट्रकचा बिघाड झाल्याने ५ तास वाहतूक ठप्प! SaamTVnews
महाराष्ट्र

नंदुरबार : कोंडाईबारी घाटात मालवाहू ट्रकचा बिघाड झाल्याने ५ तास वाहतूक ठप्प!

वाहतूक शाखेने क्रेनच्या मदतीने बिघाड झालेला ट्र्क बाजूला करून वाहतूक केली सुरळीत

दिनू गावित

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी (Kondaibari) घाटात लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रकमध्ये बिघाड झाल्याने, सदर ट्रक घाट रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्याने कोंडाईबारी घाट रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. कोंडाईबारी घाटात महामार्गाचे (Highway) काम जोमात सुरू आहे. याठिकाणी संपूर्ण रस्त्यावर खडी मुरुम असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यातच ट्रकमध्ये (Truck) बिघाड झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हे देखील पहा :

गुजरात (Gujrat) ज्यात तसेच नाशिक, जळगाव, धुळे याठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी (ST) महामंडळाच्या बसेस वाहतूककोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या ट्रकला घाटातील वाहतूक शाखेच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या मदतीने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान ट्रक चालक व प्रवाशांचे हाल झाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT