एसटी कर्मचारी 
महाराष्ट्र

पोलिसांची अडवणुकीनंतर एसटी कर्मचारी आंदोलनात; बससेवा बंदच

पोलिसांची अडवणुकीनंतर एसटी कर्मचारी आंदोलनात; बससेवा बंदच

दिनू गावित

नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचारींचा मुंबईत मोर्चा होती. याकरीता धुळे येथून काही कर्मचारी रवाना झाले. परंतु, रात्री रवाना झालेल्‍या कर्मचाऱ्यांची बस अडवून पोलिसांनी जप्‍त केली. पोलिसांच्या या अडवणुकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी शांततेच्या मार्गाने संप सुरूच ठेवला आहे. (nandubar-news-ST-workers-in-agitation-after-police-blockade-Bus-service-closed-third-day)

नंदुरबार जिल्ह्यातून मंत्रालयावर धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी आगार परिसरात शांततेच्या मार्गाने विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी संप सुरूच ठेवला आहे. एसटी प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंदच आहे. जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार चारही आगारांमधुन एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु रस्त्यात त्याची अडवणूक केली जात असली तरी एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी सलग तिसऱ्या दिवशी शांततेच्या मार्गाने काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. आज मंत्रालयावरील धडक मोर्चानंतर शासन काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र घडविण्यात एसटीचा ही मोठा हातभार असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने विचारपूर्वक न्याय द्यावा. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, यासारख्या राज्यांचा जीडीपी दर कमी असतानाही तेथील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करून न्याय दिला आहे, तसेच महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना ही शासनाने द्यावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT