amravati crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News : पाेलीसांनी वाचवला मुलाचा जीव, महिलेसह ६ अटकेत; गुप्तधनासाठी रचला हाेता नरबळीचा कट

अमरावती पाेलीस दलाचे या कारवाईमूळ सर्वत्र कौतुक होत आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यात गुप्तधन शोधण्यासाठी नरबळीचा प्रयत्न झाला. पोलीसांच्या सतर्कतेने बारा वर्षीय बालकाचा जीव वाचला आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. (Maharashtra News)

अमरावती तालुक्यातील टाकळी जहागीर येथे 11 ऑक्टोबर रात्रीच्या एकच्या दरम्यान महिलेच्या घरात अघोरी पूजा मांडण्यात आलेली होती. पोलीसांना या गाेष्टीची वेळीच माहिती मिळाल्याने पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पाेलीसांनी संबंधितांना प्रकाराची विचारणा केली असता काेणालाच समर्पक उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळावरुन एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेतले अशी माहिती साम टीव्हीशी बाेलताना प्रवीण काळे (ठाणेदार, नांदगाव पोलीस ठाणे) यांनी दिली. तसेच पायाळू असलेला बालक हा मल्हारा येथील असल्याचे निष्पन्न झाले. या बालकाला पाेलीसांनी त्याच्या पालकांच्या ताब्यात दिल्याचे काळेंनी नमूद केले.

त्यानंतर पाेलीसांनी घटनास्थळावरुन पूजा साहित्य हळद, कुंकू, सब्बल चटई हे सर्व साहित्य जप्त केले. जागरूक नागरिकांनी वेळीच पोलीसांना माहिती दिल्याने व तातडीने पोलीसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केल्याने हा नरबळीचा प्रकार हाणून पडला. या कारवाईमूळ सर्वत्र पोलीसांचे कौतुक होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT