Airoplane Saam Tv
महाराष्ट्र

नांदेड ते तिरुपती विमान सेवा होणार सुरू

नांदेड ते तिरुपती बालाजी विमान सेवा येत्या 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड ते तिरुपती बालाजी विमान सेवा येत्या 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. जागतिक पातळीवर बालाजी देवस्थानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या विमानसेवेमुळे मराठवाडा, विदर्भातील भाविकांची मोठी सोय होणार आहे.आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी ही विमानसेवा असणार आहे.

हे देखील पहा-

सायंकाळी सहा वाजून 10 मिनिटांनी नांदेडहुन उड्डाण झालेले विमान तिरुपती ला रात्री नऊ वाजून 10 मिनिटांना पोहचणार आहे. या तीनही दिवस विमान सकाळी सात वाजून 5 मिनिटांनी तिरुपती वरुन निघेल ते सकाळी 10.25 मिनिटांनी नांदेड ला पोहचेल नंतर हेच विमान पुढे मुंबई-कोल्हापूर जाईल.

ट्रूजेट कंपनीनं ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-हैदराबाद- तिरुपती अशी ही विमानसेवा राहणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड-तिरुपती सेवा सुरू करण्यासाठी बराच पाठपुरावा केला होता. लाॅकडाऊनमुळे वर्षभरापासून बंद असलेली ही विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानं भाविकांतून आनंद व्यक्त केला जात आहे .याला ट्रूजेट च्या व्यवस्थापकांनी दुजोरा दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार?

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

Top 10 Airports: जगातील सर्वात दिमाखदार टॉप १० विमानतळे, वाचा कोण कोणत्या देशाच्या एअरपोर्टचा समावेश!

Aditya Thackeray Net Worth: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

Pune Police: पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलं १३८ कोटी रुपयांचं सोनं

SCROLL FOR NEXT