Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय? आदिवासी आश्रम शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

या घटनेमुळे वसतिगृह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

Nanded News : नांदेड (Nanded) येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आदिवासी आश्रम शाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना काल हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .या घटनेमुळे वसतिगृह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही विद्यार्थिनी आश्रमशाळेत शिकत होती. मात्र काल अचानक तिने आत्महत्या केली. (Nanded Latest News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या दोन बहिणी याच आश्रम शाळेत शिकण घेत आहेत. शाळेतून आश्रमाच्या खोलीत आले असताना खोलीचा दरवाजा बंद होता. आवाज देऊन ही तरुणी दरवाजा उघडत नसल्याने व्यवस्थापनाने दरवाजा तोडणायचा निर्णय घेतला. दरवाजा तोडला असता तरुणीने पलंगला दोरी लावून गळफास घेतल्याचेही निदर्शनास आले.

आत्महत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT