Balasaheb Thackeray, Eknath Shinde, Nanded Saam TV
महाराष्ट्र

Nanded : विधान परिषदेसाठी उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शन; नांदेडहून सैनिक रवाना

साधारणतः तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

संतोष जोशी

नांदेड : सुमारे महिन्यापुर्वी महाराष्ट्रात सत्ता पालट झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे समर्थक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांत ग्रामपंचायत ते विधान भवनापर्यंत रस्साीखेच सुरु झाली आहे. अनेक शिवसैनिक शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी हाेऊ लागले आहेत. तर शिंदे गटाचे सैनिक शक्तीप्रदर्शन करीत मुख्यमंत्र्यांना आम्ही तुमच्या समवेत आहाेत असा विश्वास देताहेत. (Nanded Latest Marathi News)

नांदेड येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख शेकडो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर प्रवेश होणार आहे.

साधारणतः तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही जण रेल्वेनं मुंबईला जात आहेत. एक प्रकारे नांदेडच्या शिंदे गटाचे उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शनच असणार आहे.

आगामी काळात राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी हे शक्तीप्रदर्शन असल्याचे बोललं जातंय. उद्या दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे वेळ दिल्याचे आनंदराव बोंडारकर (जिल्हाप्रमुख) आणि उमेश मुंडे (जिल्हाप्रमुख) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT