Man burns his friends enova car Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News : उसने दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ, संतापलेल्या मित्राने मित्राची जाळली नवीकोरी १८ लाखांची इनोव्हा कार

Man burns his friends Enova car : मित्राकडून उसने घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. संतापाच्या भरात एकाने त्याच्या मित्राची १८ लाख किंमतीची इनोव्हा कार जाळल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे.

Yash Shirke

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने त्याच्या मित्राची नवी कोरी इनोव्हा कार जाळली. १८ लाख रुपयांची इनोव्हा कार जळून खाक झाली. या प्रकरणी नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश ठाकूर नावाच्या तरुणाने मनजीत पवार या त्याच्या मित्राला काही पैसे उसने म्हणून दिले होते. सुरुवातीला त्याने पैसे मागितले नाही. पण बराच काळ झाल्यानंतर दिनेशने मनजीतकडे पैशांची मागणी केली. वारंवार तगादा लावूनही मनजीत पैसे परत देत नव्हता. या गोष्टीचा दिनेश ठाकूरला प्रचंड राग आला.

उसने पैसे न दिल्याच्या रागात दिनेश ठाकूरने मनजीत पवारची नवा मोंढा भागातून नवी कोरी इनोव्हा कार घेऊन भोकर शहराचा रस्ता गाठला. भोकर जवळ गेल्यानंतर १८ लाख रुपये किंमतीच्या इनोव्हा कारवर त्याने पेट्रोल टाकले. त्यानंतर कारला आग लावून ती जाळून टाकली. गाडी जळत असताना आसपासच्या लोकांच्या मोबाईलमध्ये ही आगीचे रौद्ररुप कैद केले.

मित्राकडून पैसे उसने घेणे आणि ते पैसे वेळेवर न देणे नांदेडमधल्या एका तरुणीला महागात पडले आहे. मनजीत पवार या तरुणाने त्याच्या मित्राकडून पैसे घेतले होते. पण त्याने हे पैसे परत केले नव्हते. ज्या मित्राकडून मनजीतने पैसे उसने घेतले होते, त्याने मनजीतची १८ लाख रुपये किंमतीची नवी कोरी इनोव्हा कार जाळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर विधान परिषद निवडणूक, मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेस दाद मागणार

Women Rights : विवाहित मुलींनाही मिळणार योजनांचा लाभ; सुप्रीम कोर्टाच्या ५ महत्त्वाच्या टिप्पण्या

Fire Death: अग्नितांडव! ५ मजली रेस्टॉरंट आगीत भस्मसात; २० जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

'या' फोटोतील हिरोईनला ओळखलं का? चित्रपटसृष्टीत हक्क गाजवतेय...

Deool Band 3 : स्वामी थेट अमेरिकेत पोहचणार, राघव शास्त्रीला भेटणार अन्...; 'देऊळ बंद ३' ची कथा काय? प्रवीण तरडेंनी दिली हिंट

SCROLL FOR NEXT