नांदेड दंगल प्रकरण; आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची! पहा Video संतोष जोशी
महाराष्ट्र

नांदेड दंगल प्रकरण; आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची! पहा Video

नांदेड मधील दगडफेकीच्या घटनेतील आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. आज सायंकाळी न्यायालयासमोरच ही घटना घडली. गर्दीच्या ठिकाणी ही बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड मधील दगडफेकीच्या घटनेतील आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. आज सायंकाळी न्यायालयासमोरच ही घटना घडली. गर्दीच्या ठिकाणी ही बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आज वजिराबाद पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पाच पैकी चार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर, एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. जामिन झालेल्या आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी वजिराबाद पोलिस गाडीत घेऊन जात असताना नातेवाईकांनी आम्ही जामीन झालेल्यांना पुन्हा हजर करतो म्हणून घेऊन गेले.

मात्र, काही प्रसार माध्यमांवर आणि सोशल मिडीयावर दोन आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाले अशी बातमी पसरत आहे. यात कुठलेही तथ्य नसून कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT