Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: पत्‍नीसाठी चढला पाण्याच्या टाकीवर; उडी मारण्याची धमकी

पत्‍नीसाठी चढला पाण्याच्या टाकीवर; उडी मारण्याची धमकी

संतोष जोशी

नांदेड : माहेरी गेलेल्या पत्नी, मुलांना बोलवा यासाठी तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तीन तासांपासून हा प्रकार सुरू असून (Police) पोलिस, अग्निशमन दल, नातेवाईक घटनास्थळावर पोहंचले आहेत. (Tajya Batmya)

नांदेडमध्ये माहेरी गेलेल्या पत्नी मुलांना परत आणा; या मागणीसाठी एका तरुणाने पाण्याच्या टाकी वर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. मागणी मान्य न झाल्यास उडी मारून आत्महत्या करतो अशी धमकी देत आहे. गेल्या तीन तासांपासून हा सर्व प्रकार सुरू आहे. देविदास पाटील असे तरुणाचे नाव आहे.

आई– बहिण करताय विनंती

नांदेड (Nanded) शहरातील शारदानगर येथील पाण्याच्या टाकीवर देविदास नामक तरुण चढलाय. देविदास पाण्याच्या टाकीवर चढल्याचे कळताच आई आणि बहिण येऊन देविदासला खाली उतरण्याची विनंती करत आहेत. दोघेही रडत आहेत. दरम्यान, घटनास्थळावर पोलिस आग्निशामक दल पोहंचले असून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. देविदासची पत्नी व मुलं तेलंगणातील डीचपल्ली येथे राहतात. त्यांना बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT