Nanded Crime Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime : सोशल मीडियावर मैत्री; महिला न्यायाधीशाजवळ मागितली ५० लाखाची खंडणी; पोलिसांकडून एकजण ताब्यात

Nanded News : उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशासोबत सोशल मीडियावर मैत्री केली होती. दोघांमध्ये चांगल्यापैकी मैत्री झाल्याने त्याने मी मोठा व्यवसायिक असून माझ्या मोठमोठ्या फॅक्टरी आहे असे सांगितले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका महिला न्यायाधीशाची मैत्री करून लग्नाची मागणी केली. मात्र लग्नास नकार दिल्याने या महिला न्यायाधीशाला बदनामी करण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी खंडणी मागणाऱ्याला देगलूर येथून ताब्यात घेतले आहे. 

नांदेडच्या देगलूर येथील हिमालय उर्फ हिमांशू देवकते याने उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशासोबत सोशल मीडियावर मैत्री केली होती. दोघांमध्ये चांगल्यापैकी मैत्री झाल्याने त्याने मी मोठा व्यवसायिक असून माझ्या मोठमोठ्या फॅक्टरी आहेत; असे सांगत त्याने दुसऱ्याच्या फॅक्टऱ्या दाखवून सदर महिला न्यायाधीशाला विश्वासात घेतले. तसेच लग्न करण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. 

लग्नास नकार दिल्याने सोशल मीडियावर बदमानी 

दरम्यान महिला न्यायाधीशांनी लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने महिला न्यायाधीशाचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. तसेच वारंवार धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तू माझी पत्नी म्हणून गावी महाराष्ट्रात नाही आल्यास आणखी बदनामी करून तुझे जीवन संपवून टाकेल; अशा धमक्या देखील या आरोपीने महिला न्यायाधीशाला दिल्याचे समोर आले आले आहे. अखेर महिला न्यायाधीशाच्या तक्रारीवरून १५ जानेवारीला मेरठ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

युपी पोलिसांनी घेतले संशयितास ताब्यात 

तक्रार दाखल झाल्यानंतर तेथील पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान मेरठ पोलिसांनी देगलूर पोलिसांच्या मदतीने देगलूर तालुक्यातील तमलुर येथून हिमालय उर्फ हिमांशू मारुती देवकते या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मेरठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास उत्तर प्रदेश पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT