Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: एसबीआयचे दोन एटीएम जळून खाक; नांदेड शहरात चोवीस तासातील घटना

एसबीआयचे दोन एटीएम जळून खाक; नांदेड शहरात चोवीस तासातील घटना

संतोष जोशी

नांदेड : नांदेड शहरात मागच्‍या 24 तासांत एसबीआय बँकेच्या दोन ठिकाणच्या एटीएमला भिषण आग (Fire) लागली. या आगीत जिवीतहानी झाली नाही. मात्र, आगीत मशीनमधील पैसे आणि साहित्य जळून खाक झाले आहे. (Maharashtra News)

नांदेडमध्‍ये (Nanded) बुधवारी पहाटे पाच वाजता नविन मोंढ्यातील एसबीआय बँक (Bank) परिसरातील एटीएमला आग लागली. आगीत एटीएमसह (ATM) स्टोअर रुममधील साहित्य जळाले. तर मध्यरात्री भावसार चौकात एसबीआय बँकेच्याच दुसऱ्या एटीएमला आग लागली. या आगीत देखील पैसे आणि मशीन जळून खाक झाले. आग्निशामक दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आगीचे कारण गुलदस्‍त्‍यात

दरम्यान, आग कश्यामुळे लागल्‍या आणि आगीत किती लाखांच नुकसान झाले. हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अवघ्या 24 तासांत एसबीआय बँकेच्या दोन एटीएम ला आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT