Nanded News Saam tv
महाराष्ट्र

चॉकलेटचे अमिष दाखवत चिमुकलीवर अत्‍याचार; 60 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

चॉकलेटचे अमिष दाखवत चिमुकलीवर अत्‍याचार; 60 वर्षाच्या नराधमाला अटक

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सदर इसमार अटक करण्यात आली आहे. (nanded news Torture of a little girl showing the lure of chocolate)

लोहा जवळा येथे (Nanded News) काल ही घटना घडलीय. नरबा कांबळे असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. पिडत मुलीचे आई– वडील शेताकडे गेले होते. याची संधी साधत गावातीलच नरबा कांबळेने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले आणि अत्याचार केला. पिडीत मुलीने आईला याबाबत सांगितले. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. पिडीतेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ग्रामस्‍थांनी चोप देत दिले पोलिसांच्‍या ताब्‍यात

अत्‍याचार करणाऱ्या नराधमास गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. यानंतर त्‍याला पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT