Toll Plaza Saam tv
महाराष्ट्र

Toll Plaza : रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसुली; अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता येथे उभारला टोलनाका

Nanded News : महामार्ग क्रमांक ३६१ वर हिंगोली जिल्ह्यातील वारंगा ते नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनपेठ या ५६ किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धापूर शहराजवळ पार्डी मक्ता येथे टोलनाका उभारण्यात आला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: रस्त्याचे काम अद्याप सुरु आहे. काम अपूर्ण असताना देखील याठिकाणी टोलनाका सुरु करण्यात आला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता येथे सदरचा टोलनाका उभारण्यात आला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असताना देखील टोल वसुली सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

नागपूर- तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यातून जातो. महामार्ग क्रमांक ३६१ वर हिंगोली जिल्ह्यातील वारंगा ते नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनपेठ या ५६ किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धापूर शहराजवळ पार्डी मक्ता येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. मात्र या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू केल्याने वाहन चालकातून संताप पाहायला मिळतो आहे. 

महिना भरापासून टोल वसुली 

हिंगोलीच्या वारंगा ते नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनपेठ असा मार्ग जोडला जात आहे. हा मार्ग ५६ किमीचा असून अद्याप रस्त्याचे काम सुरु आहे. असे असताना देखील २५ नोव्हेंबरपासून टोल घेतला जात आहे. पण काही ठिकाणी काम अपूर्ण असताना टोलनाका का द्यायचा असा सवाल वाहनधारक विचारत आहेत.

दरम्यान कोणत्याही महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरून वापरणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जात असतो. हा टोल महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर घेतला जात असतो. मात्र नांदेड जिल्ह्यात काम पूर्ण होण्याच्या अगोदरच टोल वसुली केली जात असल्याचा अजब प्रकार समोर येत आहे. या कारणामुळे काही वाहन धारक व टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT