Nanded Flood Saam tv
महाराष्ट्र

Nanded Flood : नांदेडमध्ये पुरस्थिती कायम; गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, आतापर्यंत २०० कुटुंबांचे स्थलांतर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, नाल्यांना पूर आला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज देखील पूरजन्य परिस्थिती कायम आहे. यात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठावरील गोवर्धन घाट स्मशानभूमीसह परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. तर आतापर्यंत २०० कुटूंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, नाल्यांना पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून कालपासून तर नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. यामुळे गोदावरी नदीवर (Godavari River) असलेल्या विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे काल पासून उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावर असलेली गोवर्धन घाट स्मशान भूमी आणि इतर मंदिरे पुर्णतः पाण्याखाली गेली आहेत.

कुटुंबांचे स्थलांतर 

विष्णुपुरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने गोदावरी नदीच्या पुराची स्थिती धोक्याची आहे. यामुळे नदी काठच्या जवळपास २०० कुटुंबांना महापालिका प्रशासनाने स्थलांतरित केले आहे. पुराची परिस्थिती अजून कायम असून गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT