Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन विरोधात ओबीसी समाज आक्रमक; घोषणाबाजी करत निदर्शने

Nanded News : मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. यासाठी अनेकदा आंदोलन केले आहेत. तर आता २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु केले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाला ओबीसी समाजाकडून विरोध होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी केली आहे. 

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. यासाठी अनेकदा आंदोलन केले आहेत. तर आता २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आता ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले आहेत.

ओबीसी समाजाचे तहसिलसमोर निदर्शने 

एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढाई सुरु असताना या आंदोलनाला विरोध होत असल्याचे नांदेड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. नांदेडच्या हदगाव येथे ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. हदगाव तहसील मार्फत राज्य शासनाला ओबीसीच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. तसेच यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 

तर महाराष्ट्रात उद्रेक होईल 

मराठा समाजाला विविध माध्यमातून आरक्षण देण्यात आलं आहे. परंतु झुंडशाहीच्या जोरावर ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा हट्टाहस सुरु असल्याचे ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल; असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

SCROLL FOR NEXT