Nanded Umri Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : धक्कादायक! उमरी तालुक्यात आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ

Nanded Umri Taluka News : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९) एक धक्कादायक घटना घडली. धर्माबाद येथील रेल्वेरुळावर एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले.

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९) एक धक्कादायक घटना घडली. धर्माबाद येथील रेल्वेरुळावर एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले. साईनाथ अशोक चंदापुरे (वय २४) आणि सविता होळगावे (वय १९) अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केली की घातपात झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मृत तरुण आणि तरुणी दोघेही उमरी तालुक्यातील (Nanded News) नागठाणा बुद्रुक येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सविता आणि साईनाथ या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ३ महिन्यांपूर्वी सविताचे लग्न लग्न झाले होते. ही विवाहित तरुणी सासरहून माहेरला म्हणजेच नागठाणा बुद्रुकला आली होती.

गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत ती आपल्या आईसोबतच होती. मात्र, त्यानंतर सविता अचानक गायब झाली. ती बाहेर कधी निघून गेली कुणालाच याची कल्पना लागली नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता, तिचा आणि गावातील एका तरुणाचा मृतदेह रेल्वेरुळावर (Crime) आढळून आला.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. दोघांनी आत्महत्या केली, की घातपात झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

धर्माबादहून उमरीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रात्री दीड ते सकाळी सातपर्यंत तीन ते चार गाड्या धावतात. यातील एका गाडीखाली दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथामिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT