Nanded News Saam tv
महाराष्ट्र

दुर्देवी घटना..एकाच कुटूंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

दुर्देवी घटना..एकाच कुटूंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

संतोष जोशी

नांदेड : जिल्‍ह्यातील कंधार इथे जगतुंग तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्‍याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ व तीन चुलत भाऊ आहेत. ही घटना (Nanded News) आज दुपारी उघडकीस आली. (Nanded News Five Death Dam)

नांदेड (Nanded) शहरातील खुदबेनगर येथील रहिवासी असून ते कंधारच्या दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षातून पाचही जण आले होते. महिला मुले दर्ग्यात थांबले होते. तर पाच जण तलावात पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असताना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू (Death) झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक नागरिकांनी पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे.

घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिस देखील घटनास्थळावर पोहचले आहेत. मृतांमध्‍ये मोहम्मद विखार, मोहम्मद साद मोहम्मद शफीयोद्दीन, सय्यद सोहेल, मोहम्मद शफीयोद्दीन मोहम्मद गफार, सय्यद नविद सय्यद वहीद यांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT