Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक; नांदेड ते वसमत महामार्ग रोखला

Nanded News : नागपूर ते गोवा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जात आहे. ८०० किलोमीटर अंतराच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. यामुळे हा महामार्ग करण्यास शेतकऱ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नागपूर ते गोवा असा ८०० किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जात आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे. नांदेडमधून देखील महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

नागपूर ते गोवा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जात आहे. साधारण ८०० किलोमीटर अंतराच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. यामुळे हा महामार्ग करण्यास शेतकऱ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठा विरोध होताना दिसत आहे. 

एक इंचही जागा देणार नाही 

शक्तीपीठ महामार्ग होत असल्याने शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार आहे. शिवाय गुत्तेदार धार्जिना असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे या महामार्गाला आम्ही एक इंच ही जमीन देणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. याच विरोधात आज शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत तीव्र विरोध दर्शविला आहे. 

एक तास केला रास्ता रोको 

शक्तीपीठ महामार्गा संदर्भात शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे; तर दुसरा गट महामार्गाच्या विरोधात आहे. यातील महामार्गाला विरोध करणाऱ्या गटाने नांदेडमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या मालेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

SCROLL FOR NEXT