Ration Shop Saam tv
महाराष्ट्र

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Nanded News : राज्य सरकारने सुरु केलेला आनंदाचा शिधा बंद झाल्याने आता दुकानातून मिळणारे धान्यच लाभार्थ्यांना दिले जात आहे. हे धान्य देखील अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: रेशन धान्य दुकानातून दर महिन्याला गोरगरिबांना धान्याचे वाटप करण्यात येत असते. त्यानुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आलेले धान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. किडे व आळ्या असलेले रेशन धान्य वाटप करण्यात येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

नांदेडच्या उंचाडा गावातील हा प्रकार उघडकीस आला आहे. दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना धान्याचे वाटप करण्यात येत असते. राज्य सरकारने सुरु केलेला आनंदाचा शिधा बंद झाल्याने आता दुकानातून मिळणारे धान्यच लाभार्थ्यांना दिले जात आहे. हे धान्य देखील अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे लाभार्थी नागरिक संतप्त झाले आहेत. 

दिवाळी सणात चक्क आळ्या आणि किडे असलेले राशन नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात सुरु आहे. महायुती सरकारने आनंदाचा शिधा सुरू केला होता. यात साखर, चना डाळ, रवा व तेल असे दिले जात होते. परंतु दिवाळी सणाच्या तोंडावरच आनंदाचा शिधा शासनाने बंद करण्यात आला आहे. तर या महिन्यात गहू, तांदूळ व ज्वारी असे धान्य वाटप करण्यात येत आहे. 

गहू, तांदुळमध्ये आळ्या 

स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे राशन पुरवल्या जात आहे. वाटप करण्यात आलेल्या गहू, तांदूळ या धान्यांमध्ये चक्क आळ्या आणि किडे असल्याचं आढळून आले आहे. हे रेशन जनावर देखील खात नाहीत, ते माणसांना खायला देत असल्याने उंचाडा गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. इतक्या निकृष्ट दर्जाचे धान्य आम्ही कसे खाणार? असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT