Nanded News Deglur Gram Panchayat Result Stone pelting dispute between two groups Saam TV
महाराष्ट्र

Nanded News: ग्रामपंचायत मतमोजणी सुरू असताना दोन गटात राडा; एकमेकांवर तुफान दगडफेक, लोक पळतच सुटले

Nanded Gram Panchayat Election Result: मानूर गावात गुत्ती तांडा इथे हा प्रकार घडला आहे. राडा सुरू होताच नागरिकांची पळापळ झाली. या दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Nanded Gram Panchayat Election Result

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायत निवडणुकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे प्राथामिक कल हाती येत आहे. निवडणुकीत विजयी उमेदवारांकडून जल्लोष केला जात आहे. अशातच नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देगलुर तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या मानूर गावात मतमोजणी सुरू असताना दोन गटात तुफान राडा झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. मानूर गावात गुत्ती तांडा इथे हा प्रकार घडला आहे. राडा सुरू होताच नागरिकांची पळापळ झाली. या दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील मानूर गावातील गुत्ती तांडा गावात मतमोजणी सुरू होती.

यावेळी विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. यातून दोन गटात वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगड-विटांचा मारा केला. या घटनेनंतर मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या लोकांची मोठी पळापळ झाली.

या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तसेच पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपीं विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

IndBank Recruitment 2026: परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT