धक्कादायक! नांदेडमध्ये गुंडाने केला पोलिसांवर तलवारीने हल्ला SaamTvNews
महाराष्ट्र

धक्कादायक! नांदेडमध्ये गुंडाचा पोलिसांवर तलवारीने हल्ला

प्रत्युत्तरात पोलिसांनी गुंडावर झाडली गोळी; पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये एका गुंडाने तलवारीने थेट पोलिसांवर आणि पोलिसांच्या जिपवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवाजी पाटील हे जखमी झाले आणि जिपचं नुकसान झालं. तर प्रतिऊत्तरादाखल ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी हल्ला करणाऱ्या गुंड रघुसिंग बावरी वर गोळी (Saghusingh Bavari) झाडली यात बावरीच्या पायाला गोळी लागली. हा थरार आता रात्री साडेसात वाजता शहरातील वसरणी परिसरात घडला. (Shocking! In Nanded, goon attacked police with swords)

हे देखील पहा :

जखमी गुंड आणि पोलिस कर्मचाऱ्यावर नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची ही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी गुंडाची धरपकड सुरू केलीय. आज पोलीस वसरणी परिसरात रघुसिंग बावरीच्या घराकडे जात असताना रघुसिंग याने घरातील तलवार पोलिसांवर हल्ला केला. गुंड बावरीविरोधात 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT