Drought-Hit Farmer Found Dead at Finance Office saam tv
महाराष्ट्र

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Farmer Chandrakant Shinde Found Dead in Nanded: राज्यात दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असतानाच अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीये. मात्र, या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Rohit Kadam

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात असताना दिलासा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. ऐन दुष्काळात राज्यातील फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा जाच सुरू आहे. नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील खालसा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याचा मृतदेह गळफास अवस्थेत आढळलाय. कर्जवसुलीसाठी 2 दिवसांपूर्वी त्यांना गावातून नेण्यात आलं होतं. आपल्या मुलाचा घात केला हे सांगताना चंद्रकांत यांच्या आईला अश्रू अनावर झाले.

फायनान्स कंपन्यांच्या जाचासंदर्भात साम टिव्हीने बातमी लावून धरली. प्रशासनानं सबंधित खासगी फायनान्स कंपनीला सील ठोकलंय. कंपनीच्या मालकासह तीन जण गुन्हा दाखल झालाय.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना फायनान्स कंपन्यांकडून कशी लूटमार सुरू आहे तेही पाहूयात...

दुष्काळातही फायनान्स कंपन्यांची लूटमार

खासगी फायनान्स कंपनीचं ग्रामीण भागात जाळं

एजंट मार्फत शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

10 हजार रुपये देऊन हप्त्याला 1200 रुपये व्याज भरण्याचा नियम

व्याज न भरल्यास मुद्दल आणि चक्रवाढ व्याजाद्वारे पैशांची वसूली

पैसे न दिल्यास फायनान्स कार्यालयात आणून बेदम मारहाण

10 हजार रुपयांवर एक ते दोन महिन्यात लावतात 60 ते 70 हजार रुपये चक्रवाढ व्याज

दुष्काळामुळे बँका, पतसंस्था, खासगी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे सक्तीने कर्जवसुली करु नये, असे सरकारचे आदेश आहेत. तरी खासगी फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा जाच सुरू आहे. डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि थेट बळीराजाचा बळी घेण्यापर्यंत या कंपन्यांची मजल गेल्यानं राज्यभरात संताप व्यक्त होतोय. आधीच अस्मानी संकटाने पिचलेला शेतकरी अशा प्रकाराने हतबल झाला आहे. जुलमी फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करून या सावकारी जाचातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT