Nanded Crime Saam Tv
महाराष्ट्र

खळबळजनक! नालीत कचरा टाकण्याच्या कारणावरून; 2 सख्या भावाची निर्घृण खुन

शहरातील देगावचाळ परिसरात खळबळ

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) नालीत कचरा (Garbage) टाकण्याच्या कारणावरून भावकीतील वाद टोकाला गेला आहे. या वादातून चक्क चाकुने (Knife) भोसकून २ सख्या भावाचा निर्घृण खुन (killing) करण्यात आला आहे. तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील देगावचाळ भागात काल रात्री उशिरा भावकीतील लखन राजभोज आणि प्रफुल्ल राजभोज यांच्यात वाद झाला होता. (Nanded Crime The brutal killing of 2 brothers)

हे देखील पहा-

हा वाद एवढ्या विकोपाला गेला की लखन राजभोजने आपल्या नातेवाईकांना बोलावून प्रफुल्ल राजभोजच्या कुटूंबियावर सशस्त्र हल्ला (Attack) चढविला आहे. या हल्ल्यात प्रफुल्ल राजभोज आणि संतोष राजभोज या दोघांचा खुन करण्यात आला तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वजिराबाद पोलीस (Police) ठाण्यात लखन राजभोज सह ७ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ३ आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी दिली आहे. दोहेरी खुनाच्या घटनेमुळे देगावचाळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT