Nanded Crime Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime : शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Nanded News : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळा रोडलगत असणाऱ्या शेतीवरून पांडे कुटुंबीय तसेच पाटील कुटुंबियामध्ये वाद होता.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतीवरून असलेल्या जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. जुना वाद पुन्हा एकदा उफाळू येत त्यांच्यात प्रचंड हाणामारी झाली असून यात दोन्ही गटातील अनेकजण जखमी झाले आहेत. हि घटना धर्माबाद शहराजवळील येताळा रोडवर घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेडच्या (Nanded) धर्माबाद तालुक्यातील येताळा रोडलगत असणाऱ्या शेतीवरून पांडे कुटुंबीय तसेच पाटील कुटुंबियामध्ये वाद होता. हा वाद पुन्हा उफाळू आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान येताळा रोडवर धर्माबाद शहरालगत शेतीच्या वादावरून या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी (Crime News) मारहाण केली. लाठ्याकाठ्यांच्या हाणामारीत दोन्ही गटातील अनेकांचे डोके फुटले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शेतात सुरु झालेली ही हाणामारी ही रोडवर देखील सुरूच होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. (Police) पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना वेगळे केले. यानंतर दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT