Nanded Crime Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime: शेतमजुराच्या घरावर दरोडा; तीन तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने लंपास, मारहाणीत दाम्पत्य जखमी

Nanded News : रात्री ते झोपलेले असताना रात्री काहीं दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता, मेहरबान चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विमलबाई चव्हाण यांना मारहाण

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतमजुरी करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरावर रात्रीच्या सुमारास काहींनी दरोडा टाकला. यात दाम्पत्याला मारहाण करत दागिने लंपास केल्याची घटना (Nanded) नांदेडच्या लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे मध्यरात्रीच्या (Crime News) सुमारास घडली. या घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे.  (Live Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लांडगेवाडी शिवारातील माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांडगेवाडी येथे मुख्य रस्त्यालगच मेहरबान चव्हाण यांचे शेतात घर आहे. येथे वुद्ध पती-पत्नी हे परिवारासह वास्तव्यास आहेत. रात्री ते झोपलेले असताना रात्री काहीं दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यांना हटकण्याचा (Robbery) प्रयत्न केला असता, मेहरबान चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विमलबाई चव्हाण यांना मारहाण करण्यात आली. यावेळी बाजूच्या खोलीत त्याचा मुलगा, सून आणि पाच लहान मुल देखील होती. दरोडेखोरानी त्यांना शिवीगाळ करुन धमकावले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मारहाण केल्यानंतर वृध्द महिलेच्या अंगातील दागिने हिसकावून दरोडेखोर पसार झाले. यात चोरट्यांनी तीन तोळ्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. मारहाणीत जखमी पती- पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT