nanded crime news Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: खळबळजनक! ५० लाखांची खंडणी न दिल्याने परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधले अन्...

Nanded Crime News: नांदेडमध्ये ५० लाखांची खंडणी न दिल्याने १४ वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, नांदेड

Nanded crime News

नांदेडमध्ये ५० लाखांची खंडणी न दिल्याने १४ वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील तलावात बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. परमेश्वर प्रकाश बोबडे असं मृत बालकाचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

14 वर्षीय परमेश्वर हा परभणीचा आहे. परमेश्वरचे परभणी शहरातील कृषिसारथी भागातून अपहरण झाले होते. परमेश्वर हा गुरूकूल निवासी शाळेत इयत्ता नववीत होता. ७ सप्टेंबर रोजी पेपर देऊन घरी जात असताना त्याचं अज्ञात आरोपींनी अपहरण केलं.

याची माहिती त्याच्या पालकांना मिळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. परमेश्वरच्या पालकांनी वा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला.

मागितली होती 50 लाख रुपयाची खंडणी

पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर या आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांनी परमेश्वरचे हातपाय बांधून तलावात फेकल्याचे सांगितलं. या अपहरणकर्त्यांनी परमेश्वरच्या वडिलांकडून 50 लाख रुपयाची खंडणी मागितली होती.

'५० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या मुलाला जीवे मारू, अशी धमकी परमेश्वर याच्या वडिलांना देण्यात आली होती. या घटनेची माहिती परमेश्वर याचे वडील प्रकाश बोबडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिली होती.

परमेश्वरच्या वडिलांनी खंडणी न दिल्याने अपहरणकर्त्यांनी परमेश्वरचा खून करून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील तलावात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तत्पूर्वी, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT