Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News : पत्नीला नांदायला न पाठवल्याने संपवले सासूला, खूनी जावयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nanded News : लग्नानंतर सासू आपल्या मुलीला नांदायला पाठवत नव्हती. आपल्या पत्नीला घेण्यासाठी जावई अनेक वेळा सासरवाडीत जाऊन आपल्या पत्नीला नांदायला आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सासूने मुलीला पाठवण्यास नकार दिला.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: लग्न झाल्यानंतर काही दिवस पत्नी सोबत राहिली. मात्र माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीसोबत सासू मुलीला पाठविण्यास तयार नव्हती. आपल्या जावयाला माघारी फिरवून देत होती. याचा राग मनात धरून जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील नरसी या गावात घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील नरसी गावात सदरची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पारुबाई रॅपनवाड यांचा जागेवर मृत्यु झाला. या घटनेनंतर नरसी गावात एकच खळबळ उडाली. लग्नानंतर सासू आपल्या मुलीला नांदायला पाठवत नव्हती. आपल्या पत्नीला घेण्यासाठी जावई अनेक वेळा सासरवाडीत जाऊन आपल्या पत्नीला नांदायला आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सासूने मुलीला पाठवण्यास नकार दिला. 

नकार दिल्याने चाकूने वार  

वारंवार जाऊन देखील सासू आपल्या पत्नीला पाठवत नाही. याचा राग मनात असल्याने जावयाने सासूचा काटा काढायचा विचार केला. यानंतर जावई अशोक धोत्रे हा अपल्या मित्राला सोबत पुन्हा आपल्या सासुरवाडीत पत्नीला आणण्यासाठी गेला होता. यावेळी देखील मुलीला जावयासोबत पाठविण्यास नकार दिला. पत्नीला पाठविण्यावरून सासू आणि जवायामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला होता. 

जावयासोबत मित्राला अटक 

वाद सुरु असतानाच रागाच्या भरात जावयाने आपल्या जवळील धारदार चाकूने सासूवर हल्ला केला. यात गळा कापला गेल्याने सासू पारुबाई रॅपनवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळो येत पंचनामा करत संशयित आरोपी जावयाला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT