Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

भाऊबीजेच्या दिवशी दुर्देवी घटना; भाऊबीजला आलेल्‍या भावाचा पतीकडून खुन

भाऊबीजेच्या दिवशी दुर्देवी घटना; भाऊबीजला आलेल्‍या भावाचा पतीकडून खुन

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये भाऊबिजेच्या दिवशी पतीने भावाचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवणी किनवट तालुक्यातील (Nanded) जलधरा येथे रात्री ही घटना घडली. पती– पत्‍नीचे भांडण होत असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्‍या पत्‍नीच्‍या भावाचाच मृत्‍यू (Death) झाल्‍याची दुर्देवी घटना घडली. (Breaking Marathi News)

दिवाळी (Diwali) सणानंतर भाऊबीजेच्या दिवशी पती- पत्नीचे किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बायकोच्या भावालाच तु आमचा वाद सोडवण्यासाठी का आलास म्हणुन गुप्तांगावर जबर मारहाण केल्याने त्याचा (Crime News) जागीच मृत्यू झाला. याबाबत इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबुराव रामा झिगंरे आणि त्याची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरु झाले होते. भांडणाचे रुपांतर मारामारीवर गेल्याने ऐन दिवाळी सणाच्या भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला मारहाण करत असलेल्या मेव्हण्यास रोखण्यासाठी गेलेल्या बेगाजी बरडे हा पती– पत्नीचा वाद सोडवण्यासाठी गेला.

गुप्‍तांगावर केला वार

आमचे दोघाचे वाद सोडवण्यासाठी तू का आलास? म्हणुन बाबुराव झिंगरे याने बेगाजी बरडे यांच्या गळ्यास पकडून गुडघ्याने त्याच्या गुप्तांगावर मारल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. नातेवाईकांनी त्यास तातडीने जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याची गंभीर परिस्थिती पाहून जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी बेगाजी बरडे यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. भाऊ रमेश बरडे याच्या फिर्यादीवरून बाबुराव रामा झिंगरे यांच्या विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT