Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; नांदेड शहरातील खळबळजनक घटना

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा दोन जणांनी हल्ला करून खून केला आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री (२५ जानेवारी) सिडको परिसरातील वसंतराव नाईक महाविद्यालया जवळ घडली आहे. राज सरपे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. दुचाकीवर आलेल्या तरुणांनी राज याला रस्त्यात गाठून त्याच्या शरीरावर चाकूने सपासप वार केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. हल्यात ठार झालेल्या आणि हल्ला करणाऱ्यांचे पाच सहा महिन्यांपूर्वी भांडणे झाले होते. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. त्यातूनच हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड (Nanded) मध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा दुचाकी वरून आलेल्या दोघांनी हल्ला करून खून केला. या हल्यात राज याचा मृत्यू झाला. दुचाकीवर आलेल्या तरुणांनी राज याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूने वार केले यात तो जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीसांनी दिली आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांना मोठा धक्का! फुले वाड्यात वटपौर्णिमेची पूजा बंद; राज्य सरकारचा निर्णय, कारण काय?

Satara Fort : वाईजवळील ऐतिहासिक वैभव, सह्याद्रीच्या कुशीत लपलाय 'हा' भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विरारमध्ये गायींच्या तबेल्यावर कारवाईनंतर वाद; महापालिकेसमोर गायी बांधून निषेध

Chapati calories: ४ चपात्यांमध्ये किती प्रमाणात कॅलरीज असतात?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT